Khed : दुचाकीची समोरासमोर धडक एकाचा मृत्यू तिघे जखमी

एमपीसी न्यूज – दुचाकीची समोरासमोर (Khed) धडक झाली. यामध्ये एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात खेड तालुक्यातील आंबेठाण येथे मंगळवारी (दि.25) रात्री उशिरा घडला. 

या अपघातात दीपक रमेश चौधरी यांचा मृत्यू झाला असून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी राकेश मोहनलाल गुर्जर (वय 20, रा. महाळुंगे) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून ज्ञानेश्वर मोहन खोकले (रा. आंबेठाण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : ‘नको 1, 2 कोटी, हवी दर्जा दर्जेदार शिक्षणाची पाटी’

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, फिर्यादी व दीपक हे दुचाकीवरून जेवणाचा डबा घेऊन वासुली फाटा (Khed) येथे जात होते. यावेळी आरोपी हे समोरून ट्रिपल सीट आले. त्यांचा वेळ जास्त असल्याने ते फिर्यादी यांच्या दुचाकीला समोर येऊन धडकले.

या अपघातात दीपक चौधरी हे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. तर समोरील दुचाकीवरील तिघे हे खाली पडून जखमी झाले. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.