Dehuroad News : पळवून नेलेला देहूरोड येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थी सापडला

एमपीसी न्यूज – पळवून नेलेला देहूरोड येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थी सापडला आहे.

अल्पवीन विद्यार्थीच्या वडिलांनी देहूरोड पोलूस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

फिर्यादी यांचा 13 वर्षीया मुलगा हा केंद्रीय विद्यालय क्र -1 देहूरोड शाळेच्या गेटवर घरी जाण्यासाठी बसची वाट बघत असताना त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोंडाला रुमाल लावून लोकल ट्रेनने अज्ञात कारणासाठी पळवून नेले होते.परंतु त्यास पुणे रेल्वे स्टेशन येथे सोडून दिले गेले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.