Kiwale : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – शस्त्र बाळगल्या प्रकरणी (Kiwale) तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाच वाजता मुकाई चौक ते किवळे या रस्त्यावर करण्यात आली.

यश काळूराम जाधव (वय 19, रा. नऱ्हे, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार भरत माने यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, मुकाई चौकाकडून किवळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकजण शस्त्र घेऊन आला आहे.

Pakistan News : ईदच्या दिवशीच पाकिस्तानमध्ये 3 ठिकाणी स्फोट; 52 जणांचा मृत्यू

त्यानुसार पोलिसांनी यश जाधव याला ताब्यात (Kiwale) घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक तलवार आढळून आली. पोलिसांनी शस्त्र जप्त करत यश याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.