Kiwale News: बच्चे कंपनीसाठी पर्वणी ! विकासनगरमध्ये बालजत्रा आणि मोफत खाऊ गल्ली

राजेंद्र तरस यांचा वाढदिवस लहान मुलांसाठी समर्पित

एमपीसी न्यूज: युवा सेना उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांनी आपला वाढदिवस चिमुकल्यांना समर्पित केला आहे. यानिमित्त युवा सेना आणि श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने लहान मुलांसाठी बालजत्रा आणि मोफत खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर सामाजिक भान राखत किवळे-विकासनगर भागातील जनतेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

विकासनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजता हे कार्यक्रम होणार आहेत. युवा सेनेचे राज्य विस्तारक राजेश पळसकर, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी संघटिका उर्मिला काळभोर, युवा सेनेचे शहर अधिकारी विश्वजीत बारणे, जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, युवा सेनेचे मावळ तालुका उपअधिकारी विशाल दांगट आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

कोरोना महामारीने गेले दोन वर्ष शाळा बंद होत्या. नुकत्याच सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनने लहान मुलांना घरात बंदिस्त करून ठेवले. मग मुलेही प्रचंड वैतागली. त्यात विकासनगरमध्ये एकही उद्यान नसल्याने त्यांच्या खेळावर मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा मेवा’, या पंक्तीप्रमाणे मी माझा वाढदिवस या वर्षी लहानमुलांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बालजत्रा आणि मोफत खाऊ गल्ली हा उपक्रम आयोजित केला आहे. यात परिसरातील लहान मुलांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन राजेंद्र तरस यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.