Kiwale News : किवळे येथील सिम्बायोसिस ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज – इयत्ता बारावीचा आज (मंगळवारी) निकाल जाहीर झाला. सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या किवळे येथील सिम्बायोसिस ज्युनियर कॉलेज मधील बारावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून, कॉलेजचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे.

कोरोना काळात महाविद्यालयाने वेळोवेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेत एच. एस. सी. च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्षभर ऑनलाईन व काही प्रसंगी ऑफलाइन मार्गदर्शन केले. सरावात सातत्य ठेवल्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाल्याचे कॉलेजच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष प्रो. डॉ. एस. बी. मुजूमदार, सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजूमदार, प्राचार्या भावना नरसिंगोजू, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाविद्यालयाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे प्रथम तीन क्रमांकाचे निकाल खालील प्रमाणे आहे

कला शाखा
प्रथम क्रमांक – गलगली समीरण वमन 96 %
द्वितीय क्रमांक – गाडगीळ रेवा विनय 95.17%
तृतीय क्रमांक – नाटेकर किमया मंदार 95 %

विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक – मेहता सई समीर 95.67 %
द्वितीय क्रमांक – तन्वर उदयसिंग रामसिंग 92.50 %
तृतीय क्रमांक – शंकेश्वर निलेश आप्पासाहेब 89.17 %

वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक – राक्षे तेजल अशोक 96.83 %
द्वितीय क्रमांक – खलडे अनुष्का राहुल 94 %
तृतीय क्रमांक – रोंधल ओंकार संजय 92.67%

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.