Kondhwa : हलगर्जीपणामुळे बांधकाम कामगाराचा मृत्यू, बिल्डर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : इमारत बांधकामाचे (Kondhwa) काम सुरू असताना बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराने दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला. पाय स्लीप होऊन बिल्डिंगच्या डकमध्ये पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला. कोंढवा येथील टिळेकर नगर परिसरातील एका निर्माणाधिन सोसायटीत ही घटना घडली.

मरिअप्पा मल्लप्पा वनेकरी (वय 30) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. ठेकेदार मुकुंद हनुमंत राय रेड्डी आणि बांधकाम व्यावसायिक राहुल नावंदर यांच्या विरोधात कोंढवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेबराव मल्लय्या रामोशी (वय 48) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. मंगळवारी सकाळी 11:30 च्या सुमारास ही घटना घडली.

PCMC : न्यू जिजामाता रुग्णालयातील 148 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

याप्रकरणी अधिक माहिती अशी, की मरिअप्पा वनेकरी हा द्वारिकाधाम सोसायटी या निर्माणाधिन इमारतीच्या 11 नंबर या ठिकाणी काम करत होता. काम करत असताना त्याचा पाय घसरला आणि तो बिल्डिंगच्या डकमध्ये कोसळला.

यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्याचा (Kondhwa) मृत्यू झाला. ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकाने कामगारांच्या जीविताचा दृष्टिकोनातून कसल्याही प्रकारची काळजी न घेता हलगर्जीपणा दाखवल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.