Kondhwa : घरफोडी करणाऱ्या चोराला कोंढवा पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला कोंढवा पोलिसांकडून (Kondhwa) अटक करण्यात आली आहे. हि कारवाई गुरुवारी (दि.21) कोंढवा परिसरात गुन्हे शाखा पाचने केली.

अमीर अजमाईन खान (वय 20 रा.कोंढवा) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्यावरील घरफोडीचे पाच गुन्हे उघड झाले आहेत.

Stealing Sandalwood Trees : खडकी ऍम्युनेशन फॅक्टरी येथील चंदनाची झाडे चोरणाऱ्या टोळीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालत असताना घरफोडी करणारा आरोपी कोंढवा येथे आला असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खान याला ताब्यात घेतले असता त्याने घरफोडी केल्याचे मान्य केले. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख 2 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात त्याच्यावरील कोंढवा पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. कोंढवा (Kondhwa) पोलिस याचा पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.