_MPC_DIR_MPU_III

Pune : स्थानिक उमेदवार मिळण्यासाठी कोथरूडकर आक्रमक

दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे, आम्ही कोथरूडकर म्हणून झळकले फ्लेक्स

एमपीसी न्यूज – आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आल्याने कोथरूडकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे, आम्ही कोथरूडकर म्हणून कर्वे पुतळ्याजवळ फ्लेक्स झळकला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाची मते या मतदारसंघात जास्त आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

आमच्या समाजाने कायमच भाजपला साथ दिली. पाटील यांच्यासारख्या ब्राम्हण द्वेष करणाऱ्या व्यक्तीला कोथरूडमधून तिकीट नको, असे महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले. पाटील यांना तिकिट देण्यात आले तर, ब्राह्मण महासंघातर्फे उमेदवार देण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.

कोथरूडमध्ये बाहेरचा उमेदवार देण्यात येणार असल्याने ही निवडणूक चांगलीच गाजणार आहे. या मतदारसंघात मनसेची मते निर्णायक आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार? याची उत्सूकता आहे. शिवसेना काय निर्णय घेणार, याकडेही लक्ष लागले आहे. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शाम देशपांडे इच्छुक आहेत. दरम्यान, ब्राह्मण समाजाने चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला आहे. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांना तिकीट मिळणार असल्याची कोथरूड मतदारसंघात कुजबूज आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ या मतदारसंघातून प्रमुख इच्छुक आहेत. त्यांची पक्ष कशी समजूत काढणार याकडे लक्ष लागले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.