Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, पंतप्रधान मोदी यांनी केली फोन

एमपीसी न्यूज : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना ची लागण झाल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लता दिदींच्या तब्येतीची थेट पंतप्रधान मोदींनी दखल घेत लता दिदींच्या तब्येतीची फोन करुन चौकशी केली आहे. पंतप्रधानांनी लता दिदींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

 

मंगळवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि बिहारचे मुख्यमंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यांच्या तब्येतीची देखील पंतप्रधानांनी विचारपूस केली. त्याचवेळी त्यांनी लता दिदींच्या प्रकृतीची देखील फोन करुन विचारपूस केली.

गान कोकिळा लता मंगेशकर यांची कोरोना चाचणी शनिवारी पॉझिटीव्ह आली. त्यांच्या फुफ्फुसात काही प्रमाणात इन्फेक्शन आढळले असून त्यांना निमोनिया झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना त्वरित मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आयसीयू विभागात दाखल करण्यात आले. 10 जानेवारी रोजी लता दिदींना श्वास घेण्यास त्रास झाला होता. मात्र आत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधानांनी देखील लता दिदींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.