Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाले आहे. याबाबतची माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.

तसेच त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या गडकरी यांची प्रकृती उत्तम असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. तसेच सध्य ते गृहविलगीकरणात आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहे.

भाजपच्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली होती. आता केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झालेली आहे. याविषयीची माहिती त्यांनी 11 जानेवारी रोजी रात्री आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.