Talegaon Dabhade News : स्व.नथुभाऊ भेगडे पाटील कोविड केअर सेंटरला रुपये 25 हजरांची देणगी

एमपीसी न्यूज :  पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेकडून जनरल हाॅस्पिटल मधील स्व नथुभाऊ भेगडे पाटील कोविड केअर सेंटरला रुपये 25 हजरांची देणगी देण्यात आली आहे. 

तळेगाव दाभाडे नगरपरिषद, राष्ट्रीय  स्वयंसेवक संघ जन कल्याण समिती व मायमर जनरल हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव स्टेशनवरील जनरल हाॅस्पिटलमधील स्व.नथुभाऊ भेगडे पाटील काेविड सेंटर चालविले जाते. सामाजिक बांधिलकी म्हणून पै विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेकडून रूपये 25000/- चा धनादेश देण्यात आला.

यासाठी संस्थेचे आधारस्तंभ माजी राज्यमंत्री संजय (बाळा)भेगडे आणि संस्थेचे संस्थापक व पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांच्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यतीन शहा व अविनाश भेगडे यांनी धनादेश  स्विकारला.

यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे गटनेते अरुण भेगडे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश लाेणकर सचिव मंगेश सराेदे संचालक अरुण भगवान भेगडे, अषिताेश हेंद्रे,समिर जाधव, राजु चाेपडे,संचालिका शाेभा परदेशी, संस्थेचे व्यवस्थापक संदिप वाळुंज, राजेंद्र बुटे, अजय भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे संचालक सुनिल भेगडे यांनी केले. संस्थेच्यावतीने आभार संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय नाटक यांनी म‍ानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.