Loksabha election 2024 : लोकशाही वाचविण्यासाठी रवींद्र धंगेकर यांना विजयी करा : वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज – देशात लोकशाही संपविण्यासाठी सर्व प्रयत्न होत असून भाजपा देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे. भ्रष्टाचारी लोकांना वॉशिंग मशीन मध्ये टाकून स्वच्छ करण्याचा वाव ते आणत आहे, हे सामान्य जनता कधीच खपवून घेणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना संसदेत पाठवण्याचा आवाहन वंदना चव्हाण यांनी केले. तळागाळातील जनतेने त्यांना पाठिंबा दिला असून  वकिलांनी देखील  पाठिंबा देऊन त्यांचा विजय निश्चित केला आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

स्वातंत्र्यलढ्यात वकिलांचे मोठे योगदान होते. आता हे स्वातंत्र्य भाजपा हिरावू पाहत आहे परंतू त्यांचा  हा डाव कधीच  यशस्वी होणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतदारसंघातील ( Loksabha election 2024 ) जनता भाजपाला घराचा रस्ता दाखवून देणार आहे असेही यावेळी ऍड. वंदना चव्हाण यांनी नमूद केले.

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर ( Loksabha election 2024 ) यांनी शुक्रवारी शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील विविध विभागाला भेटी दिल्या. या वेळी वकिलांनी धंगेकर यांना पाठिंबा जाहीर करून लोकशाही जिवंत ठेवणारा उमेदवार आम्ही संसदेत पाठवणार असल्याची ग्वाही वकिलांनी दिली. निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. अभय छाजेड, ऍड. वंदना चव्हाण यावेळी उपस्थित होते.

 

काँग्रेस लीगल सेल, राष्ट्रवादी लीगल सेल, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार  गट ) यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष ऍड. राहुल ढाले, ऍड.विभा सिंग, ऍड. राशिदा सय्यद, अंजू डिसूजा, संजय साळवी, अश्विनी गवारे, अलका कडलक, फय्याज शेख, राजेंद्र शिंदे, अमोल नलगे, रवींद्र शिंदे, रेश्मा शिकलगार, मोहन वाडेकर, चंद्रशेखर जाधव, विठ्ठल आरुडे, संतोष जाधव, अजय नवले, हैदर पटेल, नाथा शिंगाडे, सतीश संचेती, सतीश कांबळे यांच्यासह अन्य वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रत्येक न्यायालयात जाऊन वकिलांच्या भेटी धंगेकर यांनी घेतल्या. त्यांचे आपुलकीने स्वागत करण्यात येत होते. जनसामन्यातला नेता आम्ही संसदेत पाठवणार आहोत. सामान्यांचे प्रश्न संसदेत मांडणारा लोकशाही जिवंत ठेवणारा पक्षाचा माणूस आम्ही देणार आहोत त्यामुळे आम्हाला आनंदच आहे, अशा भावना वकिलांनी व्यक्त केल्या. पुणे बार असोसिएशन, दि पूना वकिलांची ग्राहक सहकारी सोसायटी, दि पुणे लॉयर्स सोसायटी, जिल्हा महिला बार असोसिएशन, दिवाणी व फौजदारी न्यायालय, स्थानिक बार असोसिएशन, पूना बार क्लब, महिला वकील क्लबच्या वकील व सदस्यांशी धंगेकर यांनी संवाद साधला.

 

लोकशाही वाचविणारा व आमचा चेहरा आम्हाला मिळाला आहे, विजय तुमचा निश्चित आहे. तसेच समाजामध्ये लोकोपयोगी खासदार धंगेकर यांच्या रुपात आम्ही पाहतो आहे अशा भावना यावेळी वकिलांनी धंगेकर यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या.

 

Pune : भारतीय जनता पार्टीने स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत संपूर्ण पुणे शहराची वाट लावली – रवींद्र धंगेकर

महाविकास आघाडीचे  पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रविंद्र धंगेकर म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या वकिलांची ताकद मला मिळाली आहे. हीच ताकद मी लोकशाही वाचवण्यासाठी वापरणार आहे. सध्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे आणि सामान्य लोकांपेक्षा वकिलांना जास्त लढावे लागणार आहे. पुढील पिढीला वाचवण्यासाठी परिवर्तनाचा लढा आपल्याला द्यावा लागणार आहे. नागरिकांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे.

 

मी सामान्य कुटुंबातून पुढे आलो आहे त्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रश्न मला माहीत असून ते सोडवण्यासाठी मी 24 तास आपल्याला उपलब्ध आहे असेही धंगेकर म्हणाले.शिवाजीनगर न्यायालयातील सर्व संघटना, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले व धंगेकर यांना पाठिंबा जाहीर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.