LokSabha Elections 2024 : डॉक्टर म्हणताहेत आम्ही 100 टक्के मतदान करणार

एमपीसी न्यूज – रुग्णसेवेसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, मेट्रन,स्टाफनर्स व इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या  कर्मचाऱ्यांनी  न  चुकता,13 मे रोजी होणाऱ्या मावळ मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून महत्वाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 13 मे रोजी होत आहे, त्या अनुषंगाने 206 पिंपरी विधानसभा कार्यालयाकडून कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वात मोठ्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या चाणक्य हॉलमध्ये मतदान (LokSabha Elections 2024) जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.राजेंद्र वाबळे यांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

Toll Charge : निवडणुका संपेपर्यंत टोल दरवाढ नाही

येत्या निवडणुकीत मतदार यादीत नावाची तपासणी कशी करावी याबाबत वोटर हेल्पलाइनची सविस्तर माहिती नोडल अधिकारी मुकेश कोळप यांनी दिली तर सर्वांना मतदानाची शपथ देऊन मतदानाचा (LokSabha Elections 2024) प्रचार, प्रसार आपल्या मित्रपरिवार नातेवाईक यांच्यात करून लोकशाही महोत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे असे प्रफुल्ल पुराणिक यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र कांगुडे, दिनेश जगताप, महालिंग मुळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

कार्यक्रमास वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.मनीषा सूर्यवंशी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंगल सुपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री पेठकर, डॉ.मनजीत संत्रे, मेट्रन वत्सला वाजे,असिस्टंट मेट्रन अनघा भोपटकर, अधिकारी मुकेश कोळप, प्रफुल पुराणिक,सिस्टर इनचार्ज सविता निगडे,एक्स रे टेक्निशियन सालोमन मिसाळ उपस्थित होते.

तसेच भास्कर दातीर, लॅब टेक्निशियन अनिल सुतार, ईसीजी टेक्निशियन जितेंद्र शहा, प्रशासन अधिकारी संजय भांगले, रियल लाईफ रियल पीपलचे एम.ए. हुसेन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे, कॉम्प्युटर ऑपरेटर विद्या बरके, स्मिता जोशी, दूरध्वनी चालक राजश्री गायकवाड, कार्यालयीन कर्मचारी भगवंता दाभाडे, किशोर पोपटानी,सचिन कांबळे, गणेश आढाव, सुषमा जाधव, आदी कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.