Lonavala Burglary: लोणावळ्यात सव्वा चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज : बंद घराच्या किचनच्या खिडकीचा रॉड तोडून चेरट्यांनी घरातून तब्बल सव्वा चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.(Lonavala Burglary) ही घरफोडी 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत लोणावळ्यातील वळवण या परिसरात घडली आहे.

याप्रकरणी ज्ञानेश्वर उत्तम जगताप (वय 48 रा. वलवण) यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Khau Galli Inauguration : पवळे पुलाखाली क्रांती हॉकर झोनचे (खाऊ गल्लीचे) उद्घाटन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लागूनआलेल्या सुट्टीमुळे जगताप कुटुंब तीन दिवस बाहेर गेले होते. याचाच गैर फायदा घेत चोरट्यांनी घराच्या किचनच्या खिडकीचा लोखंडी रॉड तोडून घरात प्रवेश केला.(Lonavala Burglary) घरातील कपाटातून चोरट्यांनी दोन लाखांचे पाच तोळ्याचे गंठण, 80 हजार रुपयांचा दोन तोळ्याचा राणीहार, 20 हजार रुपयांची कर्णफुले, 24 हजार रुपयांचा 6 ग्रॅम वजनाचे वेल, 28 हजार रुपयांचे किंमतीचे 7 ग्रॅम वजनाचे कर्णफुले, नथ, टेम्पज गंठण,जोडवी व रोख 70 हजार रुपये असा एकूण 4 लाख 29 हजार 300 रुपयांचा एवज चोरून नेला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची लोणावळा पोलीस तपासणी करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.