Lonavala diwali pahat : शास्त्रीय संगीत व सुमधूर सुरांच्या गीतांनी लोणावळ्यात रंगली दिवाळी पाडवा पहाट

एमपीसी न्यूज : दिवाळी पाडव्याच्या निमित्त येथील सदगुरु संगीत सदन यांच्या वतीने लोणावळाकर नागरिकांसाठी खास दिवाळी पहाट या शास्त्रीय संगीत व सुमधूर गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन अँड. बापुसाहेब भोंडे हायस्कूल भांगरवाडी येथे केले होते. (Lonavala diwali pahat) भल्या पहाटेपासून गुलाबी थंडीत लोणावळाकर नागरिकांनी या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. खरंतर संगीत म्हणजे ईश्वराशी एकरुप होण्याचा सर्वोत्तम मार्ग. या संगीत साधनेमुळे लोणावळ्यातील नागरिकांची दिवाळी पाडव्याची सुरुवात मंगलमय झाली.

गेली 15 वर्ष दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे सदगुरु संगीत सदन संस्थेमार्फत अविरतपणे आयोजन केला जाते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. माजी नगरसेवक विजय शिवाजी मोरे उर्फ पोपट मोरे तसेच माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, दत्तात्रय येवले, सुरेश गायकवाड तसेच लोणावळ्यातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोणावळ्यातील गायिका मीनाक्षी गायकवाड यांनी “ओमकार प्रधान रूप गणेशाचे” हे भजन सादर केले. त्यानंतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित राजेंद्र कंदलगावकर यांच्या गायनाला सुरुवात झाली. त्यांनी सुरुवातीला राग बिलास खान तोडी मध्ये एक बंदीश सादर केली “मनवा सुमिरण हरी को” ही त्रितालमध्ये बांधलेली बंदिश सादर करण्यात आली. त्यानंतर राग अहिर भैरव मध्ये “अलबेला साजन आयो रे” ही तीन तालातील रचना यांनी सादर केली आणि सगळ्या कलाकारांनी मिळून याच रागामध्ये फ्युजन संगीत सादर केले.

Pimpri Corona Update : शहरात आज 10 नवीन रुग्णांची नोंद; 26 जणांना डिस्चार्ज

यानंतर राग मिया की तोडीमध्ये त्यांनी ताल एकताल मध्ये एक तराना सादर केला. अनुनाद दळवी यांनी संतूर वादन केले, त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला ताल झपताल मध्ये विलंबित गत सादर केली व लगेचच ताल तीन ताल मध्ये अतिद्रुत गत सादर केली. त्यानंतर पंडित राजेंद्र कंदलगावकर यांनी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा ‘इंद्रायणी काठी ‘, ‘माझे माहेर पंढरी’ हे अभंग सादर केले. (Lonavala diwali pahat) उस्ताद इकबाल वारसी यांनी आपल्या व्हायोलिन वादनाने कार्यक्रमांमध्ये रंगत आणली. त्यांनी ‘तू ही रे तेरे बिना मे कैसे जिऊ’ ‘लग जा गले आओगे जब तुम साजना’, ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ ही गीते आपल्या व्हायोलिन वरती सादर करून श्रोत्यांची वावा मिळवली कार्यक्रमाचा समारोप पंडित राजेंद्र कंदलगावकर यांनी ‘जो भजे हरि को सदा’ या भैरवी रागतील भजनाने करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये मनोज कदम (तबला), चेतन भेसानिया (हार्मोनियम), गिरीश बापट (कीबोर्ड), शरीफ खान (काहोन ड्रम्स), आर्य घंगाळे, अथर्व नवले, विशेष कालेकर (तालवाद्य), नंदा भेसानिया (तानपुरा) साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूलाल तारे यांनी केले. (Lonavala diwali pahat) या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक विजय शिवाजी मोरे उर्फ पोपट मोरे (मा. नगरसेवक), सहप्रायोजक दत्तात्रय येवले (मा नगरसेवक ), शरद कुलकर्णी (ओमकार हॉस्पिटलीटी), ॲड. प्रथमेश रजपूत (विशेष सहकार्य), ॲड. माधवराव भोंडे, अमित गवळी (मा.नगराध्यक्ष) होते. तर कार्यक्रमाचे आयोजन महेश खराडे, कुमार हारपुडे, मनोज हारपुडे, विशाल दिघे, हर्षल होगले यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.