Lonavala News : वृद्धाश्रमातील 70 ज्येष्ठांना राख्या बांधत त्यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण

एमपीसी न्यूज – स्वामी रामानंद शास्त्री  चॅरिटेबल ट्रस्ट वरसोली याठिकाणी आज आमदार सुनिल अण्णा शेळके युवती मंचच्या युवतींनी आश्रमात राहत असलेल्या 70 ज्येष्ठ नागरिकांना राख्या बांधत अनोख्या पद्घतीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

आपल्या परिवारापासून लांब राहत किंवा त्यांचे नातेवाईक या ठिकाणी पोहचू शकत नाही अशा 70 ज्येष्ठ नागरिकांना भेट देवून राखी बांधून रक्षाबंधन साजरा केल्याने आश्रमातील हे नागरिक भारावले होते. वेगवेगळ्या राज्यातून, विविध भाषिक असले तरी आमदार सुनिल शेळके करीत असलेल्या सामजिक कार्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोचली आहे.

या कार्यक्रमास आश्रमाचे चेरमन विनोद अग्रवाल, सेक्रेटरी विजयकुमार कुक्रेजा, व्यवस्थापक संदीप ठाकरे, युवती मंचच्या  डॉ. श्वेता मराठे, श्वेता गवळी, करीमा नायकुडे, पायल जाधव, दिव्या गवळी, हर्षदा मोरे, यास्मिन मुलानी, वैशाली कोंडभर, रितिका भेले, वैशाली येवले, मोना बनकर, सविता निकम यांच्यासोबत अनेक युवती उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आमदार सुनिल शेळके युवा मंचाचे सदस्य अशोक ढाकोळ, गणेश देशपांडे, अभिजित मालपोटे, उमेश शेळके, चंदू गुंड, अमृत खंडेलवाल उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.