Lonavala : लायन्स पॉईंटवरून दरीत पडलेल्या पर्यटकाचा मृतदेह काढण्यात शिवदुर्गला यश

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील लायन्स पॉईंटवरून 300 फुटांपेक्षा (Lonavala)अधिक खोल दरीत पडल्याने पर्यटकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 31) सकाळी पावणे बारा वाजता उघडकीस आली. खोल दरीत पडलेल्या पर्यटकाचा मृतदेह काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश मिळाले आहे.

 

खेमा बबन घुटे (वय 39, रा. परली, ता. सुधागड, जि. रायगड) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.

शुक्रवारी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास शिवदुर्ग रेस्क्यू टीमला लायन्स पॉईंट, लोणावळा येथून फोन आला. फोनवरील व्यक्तीने सांगितले कि, लायन्स पॉईंटवरून एकजण दरीत पडला आहे. त्यानुसार शिवदुर्गच्या टीमने लोणावळा ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, उपनिरीक्षक भारत भोसले यांच्यासह शिवदुर्गची टीम घटनास्थळी दाखल झाली.

 

Traffic News : वाहन चालकांनो सावधान ! अन्यथा तुमच्यावरही होईल गुन्हा दाखल

 

दुपारी एक वाजताच्या सुमारास टीमने रेस्क्यूचे काम सुरु केले. सुमारे 200 मीटर रॅपलींग केल्यानंतर एक मृतदेह दिसू लागला. तिथून 100 फुटांपेक्षा अधिक खोल तीव्र उतारावर, घनदाट जंगलात मृतदेह होता. थांबताही न येणाऱ्या उतारावर स्ट्रेचर आणि इतर साहित्याच्या मदतीने मृतदेह पॅक करण्यात आला. कारवीच्या जंगलात रोप अडकून गुंडाळा झाल्याने दोन वेळा रोप तुटला. अनेक अडचणींवर मात करून मृतदेह काढण्यात शिवदुर्गच्या स्वयंसेवकांना यश मिळाले.

महेश मसने, सचिन गायकवाड, हर्ष तोंडे, योगेश उंबरे, सूरज वरे, योगेश दळवी, हर्षल चौधरी, आदित्य पिलाने, प्रिन्स बेठा, आयुष वर्तक, मधुर मुंगसे, वैभव राऊळ, राजेंद्र कडू, अशोक उंबरे, गणेश रौंदळ, अमित बलकवडे, सदाशिव सोनार, चंद्रकांत गाडे, अशोक कुटे, हनुमंत भोसले, केतन खांडेभरड, संतोष खोसे, अमोल सुतार, सुनील गायकवाड या पथकाने ही कामगिरी (Lonavala) केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.