Lumpy Decease : राज्यात लम्पीमुळे 28 हजार जनावरांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : राज्यात लम्पी त्वचारोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या 28 हजारांवर पोहोचली आहे. गेल्या 17 दिवसांत 4689 जनावरांचा मृत्यू झाला. (Lumpy Decease) जुलै महिन्याच्या अखेरीपासून युद्धपातळीवर उपचार करीत असलेल्या पशुसंवर्धन विभागाचे साथीवरील नियंत्रण आता सैल झाल्याचे चित्र आहे. 

पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 17 डिसेंबरअखेर राज्यातील 35 जिल्ह्यांतील 4051 केंद्रांमध्ये लम्पी रोगाचा संसर्ग झाला आहे. बाधित गावांतील एकूण 3,93,337 बाधित पशुधनापैकी 3,16,540 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. बाधितांपैकी 27,851 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Pune News : अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवारपासून सुरु

पशुसंवर्धन विभागाने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील लम्पी त्वचारोगाची साथ नियंत्रणात आल्याचे जाहीर केले होते. मृत्युदरातही घट होत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, गेल्या महिनाभरापासून राज्यात रोज सरासरी 300 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू होताना दिसत आहे.(Lumpy Decease) पशुसंवर्धन विभागाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या दैनंदिन प्रसिद्धी पत्रकातूनच ही बाब समोर आली आहे. 1 डिसेंबर रोजी राज्यातील मृत जनावरांची संख्या 23,162 होती, ती 17 डिसेंबरअखेर 27,851 झाली आहे. गेल्या 17 दिवसांत दिवसांत 4689 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

लम्पीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना राज्य सरकारने मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार 17 डिसेंबपर्यंत 15,543 जनावरांच्या नुकसानभरपाईपोटी 14,614 पशुपालकांच्या खात्यांवर 38.87 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण 146.82 लाख लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.