Maharashtra Budget Session 2022 : राज्याचे आज अर्थसंकल्प होणार सादर

एमपीसी न्यूज – राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांनी वादळी ठरलेल्या या अधिवेशात आज 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या या अर्थसंकल्पातून कोणाला दिलासा, कोणाला निराशा हे पाहणे आज महत्त्वाचे ठरणार आहे. 

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीकडून आज तिसरा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. जनतेला या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असून राज्यसरकार नेमका कसा दिलासा देणार, कोणाला यावेळी प्राधान्य देणार, कोणत्या नवीन योजना आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 11 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, अर्थसंकल्पातील तरतूदी आणि संबंधीत इतर चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. विरोधकांचा सध्याचा रोष, सर्वसामान्यांच्या अपेक्षा, राज्याची आर्थिक घडी, कोरोना संकट, करांवरील निर्बंध, इंधन दरवाढ असे एक ना अनेक आव्हाने समोर असताना अर्थमंत्री कोणता मार्ग काढणार हे आज पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काऊंटडाऊन दहावी! भाग 10 – Tricks to score higher in SSC English Exam – Santosh Khatal. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.