Maharashtra Corona Update : धोका वाढला! राज्यात 11,877 कोरोना रुग्णांची नोंद, 50 ओमायक्रॉन बाधित

एकट्या पुण्यात आज दिवसभरात तब्बल 36 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज (रविवारी) दिवसभरात सर्वाधिक 50 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तसेच आज 11 हजार 877 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. 50 पैकी पुणे मनपा 36, पिपरी चिंचवड मनपा 8, पुणे ग्रामीण 2, सांगली 2, ठाणे 1, मुंबई 1 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 99 हजार 868 एवढी झाली आहे. त्यापैकी 65 लाख 12 हजार 610 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 2,069 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 97.21 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून, सध्या 42 हजार 024 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 41 हजार 542 जणांचा मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 2 लाख 43 हजार 250 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1,091 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.