Pune News :  पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या त्या ‘झाडफेक’ प्रकरणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी झाड फेकून मारत आरोपींना पकडले होते. खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली होती. पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. स्वतः पोलीस आयुक्त या कारवाईत कशासाठी सहभागी झाले होते? त्यांनी खरंच आरोपींच्या दिशेने झाडे फेकून मारले होते का? यासारखे अनेक प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जात होते.. हा प्रश्न राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारले असता त्यांनी स्वतः या प्रकरणावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली.. या पत्रकार परिषदेत त्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, चाकण परिसरात अशा प्रकारची घटना खरोखरच घडली आहे. मी स्वतः त्याबद्दल माहिती घेतली. पोलिसांनी आरोपी मध्ये त्या ठिकाणी संघर्ष झाला. आणि इतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समवेत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश या कारवाईत सहभागी झाले होते. ते स्पॉटवर गेले असतील तर यात गैर काय. मात्र त्यांनी खरोखरच झाड फेकून मारले की नाही याबद्दल अधिक माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी भागात काही दिवसांपूर्वी गोळीबार करून एका तरुणाचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी चाकण जवळील एका गावात लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. आरोपींना पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचं एक पथक त्या गावात गेलो होतं.

आयुक्त कृष्णप्रकाश हे या कारवाईत सहभागी झाले होते. दरम्यान पोलीस आल्याचे समजल्यानंतर आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी ही त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. तर आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आरोपींच्या दिशेने झाड फेकून मारले. यानंतर तीनही आरोपी खाली पडले आणि पोलिसांनी त्यांना पकडले, असे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.