Maharashtra Corona Update : आज 123 नवे कोरोना रुग्ण, 112 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शुक्रवारी) दिवसभरात 123 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 112 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, आजवर 78 लाख 74 हजार 1470 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 77 लाख 25 हजार 451 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.11 टक्के आहे.

 

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 911 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 1 लाख 47 हजार 785 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. आजपर्यंत 7 कोटी 94 लाख 20 हजार 815 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.