Pimpri News : दस्त नोंदणी शुल्कापोटी ‘टाटा मोटर्स’ ने 160 कोटी भरले; प्राधिकरण विसर्जित झाल्याने महापालिकेला लाभ

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड नवनगर प्राधिकरणाने भाडेपट्टयाने वाटप केलेल्या भूखंडांची मालकी आणि ताबा पिंपरी – चिंचवड महापालिकेकडे आला आहे. त्यामुळे टाटा मोटर्स कंपनीने दस्त नोंदणी हस्तांतरण शुल्कापोटी महापालिकेकडे 160 कोटी रुपये जमा केले आहेत. 

याबाबतची माहिती भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली. 7 जून 2021 रोजी पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित झाले. प्राधिकरणाने भाडेपट्टयाने वाटप केलेल्या भूखंडांची मालकी आणि ताबा हा पिंपरी – चिंचवड महापालिकेकडे देण्यात आला.

या भूखंडांच्या हस्तांतरण आणि विविध कामांसाठी महापालिकेने विशेष कक्षाची निर्मिती केली. अपुरी कामगार संख्या, नवीन कामकाज यांमुळे अडचणी आल्या. तथापि, त्यावर मात करत भूमी – जिंदगी विभागाने 31 मार्च 2022 या सरत्या आर्थिक वर्षात 165 कोटी 75 लाख रुपयांची वसूली केली. त्यात टाटा मोटर्स कंपनीच्या दस्त नोंदणी हस्तांतरण शुल्काचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.