Maharashtra Corona Update : दिवसभरात 11,088 नवे रुग्ण; 10,014 जण कोरोनामुक्त

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 35 हजार 601 एवढी झाली आहे. : 11,088 new patients throughout the day; 10,014 released

एमपीसी न्यूज – राज्यात आज 11 हजार 088 नव्या रूग्णांची नोंद झाली तर 10 हजार 014 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 35 हजार 601 एवढी झाली आहे.

राज्यातील एकूण 5 लाख 35 हजार 601 रुग्णांपैकी आजवर 3 लाख 68 हजार 435 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 48 हजार 553 सक्रिय रुग्ण आहेत.

दिवसभरात आज 256 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 18,306 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने हि आकडेवारी जाहीर केली आहे.

राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 68.79 टक्के एवढे आहे. राज्यात आज 256 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.42 टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 28 लाख 37 हजार 578 नमुन्यांपैकी 5 लाख 35 हजार 601 नमुने पॉझिटिव्ह (18.87 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 04 हजार 233 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 648 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्य सरकारकडून येत्या चार दिवसांत याबाबतचे आदेश जारी करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मास्कच्या क्वालिटीनुसार आम्ही दर नियंत्रित करणार आहोत. तसेच कोरोनाच्या चाचणीचे दरही आपण 1900 रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. तर घरी जाऊन चाचणी करण्यासाठी नागरिकांना 2400 ते 2500 रुपये मोजावे लागतील, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.