Maharashtra Corona Update : राज्यात आज 138 कोरोना रुग्णांची नोंद, शून्य मृत्यू 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात नव्यानं वाढ होणा-या दैनंदिन कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. आज (शनिवारी) दिवसभरात 138 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 137 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज दिवसभरात एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, आजवर 78 लाख 73 हजार 369 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 77 लाख 24 हजार 697 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.11 टक्के आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 893 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 1 लाख 47 हजार 779 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजपर्यंत 7 कोटी 92 लाख 08 हजार 961 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.