Maharashtra Corona Update : राज्यात आज 23,371 रुग्णांना डिस्चार्ज; 8,142 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात तब्बल 23 हजार 371 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज नव्याने 8 हजार 142 बाधित रुग्णांची वाढ झाली. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णापेक्षा जवळपास अडीच पट अधिक आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 16 लाख 17 हजार 658 एवढी झाली असून राज्यात सध्या 1 लाख 58 हजार 852 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर तब्बल 14 लाख 15 हजार 679 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज 180 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 42 हजार 633 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 87.51 टक्के एवढा झाला आहे तर, 2.63. टक्के एवढा मृत्यूदर आहे. राज्यात आजवर 83‌ लाख 27 हजार 493 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

त्यापैकी 16 लाख 17 हजार 658 एवढ्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. राज्यात सध्या 24 लाख 47 हजार 292 जण होम क्वारंटाइन आहेत तर, 23 हजार 312 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा अडीच पट अधिक आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नव्या रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 87.51 टक्के एवढा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.