Maharashtra Corona Update : राज्यात 51,834 ॲक्टिव्ह रुग्ण, आज 4,696 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज (सोमवारी) बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात आज दिवसभरात 3 हजार 741 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 4 हजार 696 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा 51 हजार 834 वर जाऊन पोचली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 लाख 60 हजार 640 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 68 हजार 112 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 52 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 37 हजार 209 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 97.02 टक्क्यांवर पोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 5 कोटी 38 लाख 12 हजार 827 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 88 हजार 489 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 299 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.