Maharashtra Corona Update : दिवसभरात 11,391 जण कोरोनामुक्त, राज्यातील एकूण रूग्णसंख्या 6 लाखांच्या पुढे

आजवर राज्यातील 4 लाख 28 हजार 514 जण कोरोनामुक्त झाले आहेत. : During the day, 11,391 people were corona-free, bringing the total number of patients in the state to over 6 lakh

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात तब्बल 11 हजार 391 जण कोरोनामुक्त  झाले असून 8 हजार 493 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रूग्णसंख्या 6 लाखांच्या पुढे गेली आहे. असे असले तरी राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आजवर राज्यातील 4 लाख 28 हजार 514 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 04 हजार 358 एवढी झाली आहे.

त्यापैकी सध्या 1 लाख 55 हजार 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर राज्यातील 4 लाख 28 हजार 514 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 228 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्यातील एकूण मृतांची संख्या 20 हजार 265 इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून राज्याचा रिकव्हरी रेट 70 टक्के एवढा झाला आहे तर, राज्यातील मृत्यूची टक्केवारी 3.36 इतकी आहे.

महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत, अशा जिल्ह्यांच्या यादीत पुण्याचाही समावेश आहे.

त्यामुळे पुणे शहरात नेमक्या किती लोकांना कोरोनाची लागण झाली आणि पुण्यात कोरोनाचा कम्युनिटी प्रसार तर झालेला नाही हे तपासण्यासाठी पुण्यात सिरो सर्व्हे करण्यात आला आणि याचा अहवाल जारी करण्यात आला आहे.

पुण्यातील सिरो सर्व्हे अहवालानुसार 36.1% ते 65.4% इतक्या लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज सापडल्या आहेत.

याचा अर्थ या लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती. पुण्यातील 5 प्रभागांमध्ये 20 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आलं.

1 जुलैपर्यंत पुणे महापालिकेच्या प्रशासकीय क्षेत्रात कोरोनाची पुष्टी झालेल्या पाच प्रभागांचा अभ्यास केला. एकूण 1,664 व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. या रक्तातील अँटिबॉडी तपासण्यात आल्या. त्यावेळी या प्रभागांमध्ये कोविड-19 संक्रमणाचा व्यापक प्रसार झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.