Maharashtra Corona Update : राज्यात आज पाच हजारांहून कमी कोरोना रुग्ण, 145 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) 4 हजार 575 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 5 हजार 914 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज 145 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 लाख 20 हजार 510 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 27 हजार 219 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.99 टक्के एवढा झाला आहे.

ज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली असून, महाराष्ट्रात सध्या 58 हजार 069 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 1 लाख 35 हजार 817 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्यात आतापर्यंत 5 कोटी 21 लाख 24 हजार 250 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 20 हजार 905 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 623 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.