Maharashtra Corona Update : राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.17 टक्क्यांवर; आज 2,779 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची ( Corona Positive patients) संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. आज दिवसभरात राज्यात 2 हजार 779 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 50 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 03 हजार 657 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 06 हजार 827 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 44 हजार 926 सक्रिय रुग्णांवर (Active Patients) उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात 3 हजार 419 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट (corona Recovary Rate) 95.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 684 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 50 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.53 टक्के एवढा आहे.

आजवर करण्यात आलेल्या 1 कोटी 40 लाख 80 हजार 930 नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी 20 लाख 03 हजार 657 नमुने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 13 हजार 414 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 019 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

सध्या राज्यातील पुणे, ठाणे मुंबई, नागपूर, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.