Maharashtra Corona Update : राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्के, आज 4,780 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (रविवारी) 4 हजार 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, 4 हजार 780 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 64 लाख 24 हजार 651 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 31 हजार 999 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या 530 हजार 182 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 145 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 35 हजार 962 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 5 कोटी 22 लाख 92 हजार 131 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 12 हजार 151 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 526 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.