Maval Corona Update : तालुक्यात आज 12 नवीन रुग्ण; तीन महिन्यातील निच्चांक!

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात रविवारी (दि.22) 12 रुग्ण आढळले, सुमारे तीन महिन्यातील हा निच्चांक आहे. यामुळे कोरोनाचा कहर तालुक्यात कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

त्याचबरोबर सक्रीय रुग्ण संख्या देखील सातत्याने कमी होत आहे. ही बाब दिलासादायक असलीतरी कोरोनाचे संकट अद्याप टळले नसल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. तालुक्यात दिवसभरात 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 523 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 250 आहे. शहरी भागात 09 तर ग्रामीण भागात 03 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 08 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 01 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 26,624 झाली आहे. तर दिवसभरात 36 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात दारूंब्रे, पाचाणे व सुदुंबरे येथे प्रत्येकी 01असे एकूण 03 रुग्ण सापडले. 25,851 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 523 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,411, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,399 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1326 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 14,136 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,488रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97.01 टक्के आहे तर मृत्यू दर 1.96 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 112 लोणावळा नगरपरिषदमध्ये 32 वडगाव नगरपंचायतमध्ये 05 व ग्रामीण भागात 101 असे एकूण 250 रुग्ण आहेत.अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.