Maharashtra Corona Update : आज 3827 नवीन रुग्ण तर 1935 रुग्ण कोरोनामुक्त, दिवसभरात 142 मृत्यूंची नोंद

Maharashtra Corona Update: Today 3827 new patients and 1935 patients corona free, 142 deaths recorded in a day राज्यातील एकूण 1,24,331 रुग्णांपैकी 62,773 कोरोनामुक्त, 5893 कोरोनाबाधितांचा मृत्यू, सक्रिय रुग्णांची संख्या 55,651

एमपीसी न्यूज – राज्यात आज 3 हजार 827 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज 1 हजार 935 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 62 हजार 773 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 55 हजार 651 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात 142 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. यासह आतापर्यंत 5893 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 114, ठाणे 2, वसई विरार 5, सोलापूर 1, औरंगाबाद 8, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव येथील प्रत्येकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार आज झालेल्या मृत्यूंमध्ये 89 पुरुष आणि 53 महिला आहेत. यात 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे 74 रुग्ण, 40 ते 59 वयोगटातील 57 रुग्ण आणि 40 वर्षाखालील11 रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात सध्या 60 शासकीय आणि 43 खाजगी अशा एकूण 103 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत 7 लाख 35 हजार 674 नमुने प्रयोगशाळांत पाठवण्यात आले असून त्यातील 1 लाख 24 हजार 331 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 91 हजार 049 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये तर 25 हजार 697 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.