Maharashtra Corona Update : राज्यात आज 3940 नवे रुग्ण, 3119 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज, शनिवारी 3 हजार 940 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 3 हजार 119 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 17 लाख 81 हजार 841 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाख 92 हजार 707 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 61 हजार 095 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात असून 3 हजार 119 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.14 टक्के झाले आहे.

आज दिवसभरात राज्यात 74 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 48 हजार 648 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.57 टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या 5 लाख 360 जण होम क्वारंटाईन आहेत तर 4 हजार 20 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत जवळपास 1 कोटी 20 लाख 59 हजार 235 नमूने तपासण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.