Maharashtra Corona Update : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.76 टक्के; 308 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून 26 हजार 440 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 11 हजार 416 नवीन रुग्णांचे निदान झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे.

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 15 लाख 17 हजार 434 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 12 लाख 55 हजार 779 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

सध्या 2 लाख 21 हजार 156 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 308 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण मृतांची संख्या 40 हजार 40 इतकी झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 75 लाख 69 हजार 447 नमुन्यांपैकी 15 लाख 17 हजार 434 नमुने पॉझिटिव्ह (20.5 टक्के) आले आहेत.

राज्यात 22 लाख 68 हजार 57 लोक होम क्वारंटाईन आहेत तर, 24 हजार 994 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.