Maharashtra : सुतार समाजाच्या उन्नतीसाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार – एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समिती,सकल सुतार समाज व सहभागी संलग्न महाराष्ट्र राज्य ( Maharashtra) आयोजित विश्वकर्मीय सुतार समाजाचा भव्य राज्यस्तरीय महामेळावा रविवार,दि.24 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे (फ्रुटवाले धर्मशाळेत) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात हजारो सुतार समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ लाइव्ह कॉन्फरन्स द्वारे मेळाव्यात म्हणाले आजच्या मेळाव्याचा उद्देश महत्वाचा आहे. सामाजिक न्याय ,शैक्षणिक स्थर ,आर्थिक सक्षमीकरण ,समाज प्रबोधन ,सामाजाभिमुख उपक्रम राबवण्यासाठी आजच्या मेळाव्या मध्ये संकल्प ही केलेला   आहे.त्याच बरोबर समजा मध्ये जागृती निर्माण करणे,समाज कल्याणाचा विचार करणे ,सर्वांगीण पद्धतीचा ध्यास घेणे.
हे खऱ्या अर्थाने अश्या समाज मेळाव्यातून करणे सोपे होते. समाज म्हणून एकत्र येत लोककल्याणकारी विचारांची देवाण घेवाण करायची असते.एक विकासाच्या प्रक्रियेत सर्व सामील व्हावेंत. यासाठी पुढाकार घ्यायचा असतो. समस्येचे निराकरण कसे करता येईल यावर मंथन सुध्दा करायचं असत.प्रत्येक समाजासाठी एकत्र येऊन मंथनाची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते.
कारण त्याच बरोबर  आपण जेव्हा विचारांचे आदान प्रदान करतो ,विचारांची देवाणघेवाण करतो, साधक बाधक करतो. त्यामुळे पर्याय सापडत असतात. महाराष्ट्राची भूमी संताची भूमी आहे,महापुरुषांची भूमी आहे .बलिदान दिलेले आहे. त्यांच्या या योगदानाने नव्या भारताची ,महाराष्ट्राची जडण घडण झाली आहे.
सुतार समाजाच्या उन्नतीसाठी संत भोजलिंग  आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून यासाठी 50 कोटी रुपयांचे निधी तातडीने मंजूर केला जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यावेळी दिले.मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले कि, सुतार समाजाच्या 13 मागण्यांपैकी महामंडळ स्थापनेची घोषणा आजच करीत करतो तर उर्वरीत 12 मागण्यांसाठी एक स्वतंत्र बैठक घेवून सकारात्मक निर्णय दिला जाईल,असे संकेत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
 तसेच त्यांनी सरकारने घेतलेले निर्णय हे सर्व सामान्य माणसाच्या हिताचे आहे याबाबत माहिती दिली.प्रधानमंत्री यांनी दिलेला लोकल फॉर लोकल ची या ठिकाणी माहिती त्यांनी दिली.मेकिंग इंडिया बद्दल माहिती विशद केली.आज देशाला जगभरात अतिशय मानाच स्थान  व  आदरच स्थान मिळवून देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केलेले आहे.असे यावेळी त्यांनी सांगितले.
मोठं मोठ्या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था सद्यस्थितीची त्यांनी  यावेळी माहिती दिली.तसेच पंतप्रधान योजना,मुख्यमंत्री योजना,विश्वकर्मा योजना ,रोजगार संधी याबाबत त्यांनी माहिती दिली.व सुतार समाजाने म्हत्व पूर्ण केलेले कार्य याविषयी त्यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स अगोदर आमदार महेश लांडगे,आमदार डॉ. संजय रायमुलकर,  प्रमोद भानगिरे,विश्वकर्मीय सुतार समाजाचे मुख्य प्रशासकीय राज्य समन्वयक प्रा. विद्यानंद मानकर,हनुमंत पांचाळ,गंगाधर पांचाळ यांनी मनोगत व्यक्त केली. मेळाव्याच्या उदघाटनपूर्वी हभप संतोष ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीतून बाल वारकऱ्यांसह संत भोजलिंग काका प्रासादिक दिंडी काढण्यात आली होती.
ज्ञानेश्वर माऊली देवस्थान ट्रस्टला 2 किलो चांदीच्या पादुका अर्पण केल्याबद्दल दत्तात्रय सुतार(इचलकरंजी) यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.व त्यांच्या बरोबर बाळासाहेब टकले यांचा सत्कार करण्यात आला.  नारायण भागवत यांनी तीन दिवसांत पूर्ण केलेले महामेळावा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व त्यांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात भोजलींग काका जन्मस्थळ व समाधीस्थळ जीर्णोद्धार मागणी  करण्यात ( Maharashtra) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.