Pune : जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीचा केला खून; मद्यपान केलेल्या पतीचे धक्कादायक कृत्य

एमपीसी न्यूज – मद्यपान केलेल्या पतीने जेवण न दिल्यामुळे  पत्नीला ( Pune ) बुक्क्या मारून  खून करण्याची घटना पुण्यातील कात्रज भागात घडली . माधुरी कांबळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तानाजी कांबळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी यांचा मुलगा पीयुष कांबळे ने याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Maharashtra : सुतार समाजाच्या उन्नतीसाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार – एकनाथ शिंदे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी कांबळे हा पेशाने पेंटर असून रोजंदारी वर काम करत होता. कांबळे दररोज घरी येताना मद्यपान करून येत असे. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तानाजी नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी आला होता. यावेळी त्याने त्याच्या पत्नी माधुरीला जेवायला वाढण्यास सांगितले.

यावर तिने त्याला जेवण न बनवल्याचे उत्तर दिले. जेवण न दिल्याच्या रागातून तानाजी ने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरू केलं. यादरम्यान त्याने माधुरी हिच्या छातीवर जोर जोरात बुकक्या मारल्या या मारहणीनंतर माधुरी खाली कोसळली आणि यात तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास पोलीस करत ( Pune ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.