Mumbai News : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या 48 व्या कुमार, कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – पुणे शहर आयोजित 48 व्या कुमार, कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत खेळणाऱ्या संघाची गटवारी जाहीर करण्यात आली. मुंबई शहर, पुणे, अहमदनगर हे संघ फ गटात एकमेकांना भीडणार आहेत.

मुंबई शहर विरुद्ध नांदेड आणि पुणे विरुद्ध अहमदनगर या फ गटातील कुमार गटातील, तर पुणे विरुद्ध परभणी(अ) आणि बीड विरुद्ध नाशिक(ब) या कुमारी गटातील लढतीने या स्पर्धेला प्रारंभ होईल. कुमार गटात सर्व संलग्न म्हणजे 25 जिल्ह्याच्या संघांनी आपला सहभाग नोंदविला असून कुमारी गटात नंदुरबार, जालना वगळता इतर 23 जिल्ह्याच्या संघांनी सहभाग घेतला आहे.

या सर्व संघाची 6 गटात विभागणी करण्यात आली असून सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. साई चौक, मेट्रो मैदान,मोझे कॉलेज जवळ, बालेवाडी गाव, पुणे येथील मैदानावरील या करिता 6 क्रीडांगणे तयार करण्यात येत आहेत. या अगोदर आंबेजोगाई-बीड येथे झालेल्या 46 व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमार गटात ठाणे जिल्हा संघ विजेता, तर रत्नागिरी जिल्हा उपविजेता ठरला होता. कुमारी गटात पुण्याने आपली परंपरा कायम राखत विजेतेपद प्राप्त केले होते, तर बीड जिल्ह्याने उपविजेतेपद मिळविले होते.

यंदा देखील कुमारी गटात पुण्याकडेच विजेतेपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे, तर घरच्या मैदानावर पुण्याच्या कुमारांचा संघ विजेतेपद मिळविणार का? ते पहाणे औत्सुक्याचे ठरेल. 47 वी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोविड संसर्गामुळे घेण्यात आली नव्हती, तर पनवेल-रायगड येथे मैदानी निवड चाचणी घेऊन संघ राष्ट्रीय स्पर्धेकरिता पाठविण्यात आले होते. आज या स्पर्धेची गटवारी राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी प्रसार माध्यमांकरिता या परिपत्रकाद्वारे जाहीर केली. ती खालील प्रमाणे.

कुमार गट मुले गटावर विभागणी –
अ गट – १) ठाणे, २) रायगड, ३) परभणी, ४) हिंगोली.
ब गट – १) रत्नागिरी, २) मुंबई उपनगर, ३) औरंगाबाद, ४) सोलापूर.
क गट – १) पालघर, २) लातूर, ३) सातारा, ४) धुळे.
ड गट – १) कोल्हापूर, २) सिंधुदुर्ग, ३) सांगली, ४) जळगाव.
इ गट – १) नाशिक, २) बीड, ३) जालना, ४) नंदुरबार.
फ गट –  १) मुंबई शहर, २) पुणे, ३) अहमदनगर, ४) उस्मानाबाद, ५) नांदेड.

कुमारी गट मुली गटवार विभागणी –
अ गट – १) पुणे, २) ठाणे, ३) परभणी.
ब गट – १) बीड, २) रायगड, ३) नाशिक, ४) हिंगोली.
क गट – १) औरंगाबाद, २) सोलापूर, ३) सातारा, ४) नांदेड.
ड गट –  १) कोल्हापूर, २) सांगली, ३) रत्नागिरी, ४) जळगाव.
इ गट –  १) मुंबई उपनगर, २) अहमदनगर, ३) सिंधुदुर्ग, ४) धुळे.
फ गट –  १) मुंबई शहर, २) पालघर, ३) लातूर, ४) उस्मानाबाद.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.