Pimpri News : अक्षय तृतीयानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे जनकल्याण यज्ञ

एमपीसी न्यूज – अक्षय तृतीया आणि परशुराम जयंतीच्या निमित्त मंगळवारी (दि. 3) अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे जनकल्याण यज्ञ अर्थात सार्थ श्री विष्णुयागचे आयोजन करण्यात आले.

समाजातील सर्व जाती – पंथांना  एकत्र घेऊन हिंदु धर्माची परंपरा जपण्याचा प्रयत्न अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ करीत आहे. तसेच समाजातील निर्माण झालेली तेढ, कलह, अशांतता निघून जाण्यासाठी, हिंदु एक राष्ट्र भावना जागरुक होऊन एकसंघ व्हावे आणि सर्व प्राणी मात्रांना निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

या धर्म जागरण यज्ञकर्मात सर्व जाती पंथांच्या जोड्या यजमान म्हणून बसल्या होत्या. हे या सोहळ्याचे विशेष मुख्य आकर्षण ठरले. यामध्ये श्री व सौ.  मोरे, श्री व सौ. भाग्यवंत, श्री व सौ. ढगे, श्री व सौ. भोसले, श्री व सौ. दासरवार, श्री व सौ. सुतार, श्री व सौ. बल्लोळी, श्री व सौ. सोनपाटकी, श्री व सौ. तुंगार, श्री व सौ. नंद, श्री व सौ. कुलकर्णी यांनी यात सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.