Chakan News : पेटीएम द्वारे पैसे दिल्याचे भासवून दोन वेळा केली कपड्यांची खरेदी; एकास अटक

एमपीसी न्यूज – कपड्यांच्या दुकानात कपडे खरेदी करून पैसे पेटीएमद्वारे दिले असल्याचे भासवले. त्यानंतर पुन्हा एकदा येऊन कपडे खरेदी करून पुन्हा पेटीएम द्वारे पैसे दिल्याचे भासवून दुकानदाराची फसवणूक केली. हा प्रकार 1 मे आणि 3 मे रोजी माँ कलेक्शन महाळुंगे येथे घडली.

शुभम सुमंत ढाले (वय 24, रा. महाळुंगे, ता. खेड), नितीन साळुंखे (रा. महाळुंगे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत शुभम याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मगाराम जेसाराम चौधरी (वय 28, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे तोंडाला मास्क प्रमाणे रुमाल बांधून फिर्यादी यांच्या कपड्याच्या दुकानात आले. त्यांनी 2100 रुपयांचे कपडे खरेदी केले. त्याचे पैसे पेटीएम द्वारे दिले असल्याचे आरोपींनी भासवले.

त्यानंतर 3 मे रोजी आरोपी पुन्हा फिर्यादी यांच्या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आले. आरोपींनी पुन्हा 3500 रुपयांचे कपडे खरेदी केले. त्याचेही पैसे पेटीएम द्वारे दिले असल्याचे आरोपींनी भासवले. दोन्ही वेळेला आरोपींनी एकूण पाच हजार 600 रुपये पेटीएम द्वारे दिले असल्याचे भासवून फिर्यादी यांची फसवणूक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.