Dehuroad News : आदर्श शिक्षिका भाग्यश्री मिरजकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टॉमेंट मधील आदर्श शिक्षिका  भाग्यश्री प्रभाकर मिरजकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 55 होते.

भाग्यश्री मिरजकर यांनी आपल्या 32 वर्षाच्या काळात अनेक विद्यार्थी घडविले. सामाजिक भान ठेवून अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. कष्टकरी वर्गाला कपडे आणीबफळे यांचे वाटप करण्याचा उपक्रम त्या अनेक वर्षे करीत होत्या.

त्यांच्या अचानक निधनामुळे विद्यार्थी आणि शिक्षकवर्गाने दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. उद्योजक अजित देशपांडे यांच्या त्या बहिण होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.