Moshi News : मोशीतून बुलेट, चाकणमधून टायरची चोरी

एमपीसी न्यूज – मोशी येथील एका सोसायटीच्या पार्किग मधून बुलेट दुचाकी तर चाकण येथून कंटेनरच्या ट्रेलरचे टायर चोरून नेले. या दोन्ही प्रकरणात मंगळवारी (दि. 3) एमआयडीसी भोसरी, चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रवींद्र शिवाजी सायकर (वय 26, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची एक लाख रुपये किमतीची बुलेट दुचाकी चोरून नेली. ही घटना 29 एप्रिल रात्री सात ते 3 मे सकाळी सहा वाजताच्या कालावधीत ही घटना घडली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

सोहनलाल ओमप्रकाश चौधरी (वय 33, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी त्यांच्या कंटेनरचा ट्रेलर एस के कंपनी चाकण येथे मोकळ्या जागेत पार्क केला होता. सोमवारी (दि. 2) रात्री आठ ते मंगळवारी (दि. 3) सकाळी आठ या वेळेत अज्ञात चोरट्याने ट्रेलरचे 72 हजार रुपये किमतीचे सहा टायर चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.