Maharashtra : मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण मंगळवारपासून सुरू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या (Maharashtra) नियोजनानुसार मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण मंगळवारपासून (दि. 23 जानेवारी) सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय ट्रेनिंग जिल्हाधिकारी कार्यालय, तर महानगरपालिकास्तरीय ट्रेनिंग महानगरपालिकेत देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ट्रेनिंगमध्ये मास्टर ट्रेनर अश्विनी सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक तालुक्यातुन 300 एन्युमरेटर्समागे एक ट्रेनर, 300 ते 600 साठी दोन ट्रेनर, तर 600 पेक्षा जास्त एन्युमरेटर्ससाठी तीन ट्रेनर नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर ट्रेनिंग घेतलेले तालुकास्तरीय ट्रेनर तालुक्यासाठी नियुक्त सुपरवायजर आणि एन्युमरेटर्स शनिवार आणि रविवारी (21 आणि 22 जानेवारी) तालुक्याच्या ठिकाणी ट्रेनिंग देणार आहेत.

Pune : कसबा मतदारसंघातील विविध मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान

गोखले इन्स्टिट्यूटकडील मास्टर ट्रेनर तालुकास्तरीय ट्रेनिंगला मदत (Maharashtra) करतील. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यत जिल्हा मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत. सर्वेक्षणाचे काम दि. 23 ते 31 जानेवारी या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी तालुकास्तरावर 15 नोडल, 15 असिस्टंट नोडल ऑफिसर, 466 सुपरवायजर आणि 6596 एन्युमरेटर्सची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.