Manobodh by Priya Shende Part 21 : मनोबोध भाग 21 – मना वासना चुकवी येरझारा

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक एकवीस.

मना वासना चुकवी येरझारा

मना कामना सांडले द्रव्य दारा

मना यातना थोर हे गर्भवासी

मना सज्जना भेटवी राघवाचे

माणसाच्या जिवंतपणी जर इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या तर तो जन्ममृत्यूच्या फेर्‍यात पडतो. पण जर वासनाच नसतील तर या जन्म-मृत्यूचा प्रश्नच राहणार नाही, असं समर्थांनी सांगितलं आहे. मुक्तीमधला किंवा मोक्षा मधला ही मोठा अडथळा, म्हणजे ही वासना आहे. वासनेमुळे येरझारा म्हणजे पृथ्वीवर येणे-जाणे, जन्म-मृत्यूच्या चकव्यात, तुम्ही अडकून पडता. ते वासनेचा त्याग कर. नाहीतर परत परत गर्भाचं दुःख यातना भोगावे लागतील. अंत समयीचं दुःखही होणार. यातून सुटका हवी असेल तर ही वासनाच नको. हा मोह सोडून त्यापलीकडे काय आहे ते बघाच समर्थ सांगत आहेत.

पुढे ते म्हणत आहेत की, मना कामना सांडी रे द्रव्य दारा. कामना म्हणजे प्रबळ इच्छा किंवा इर्षा. द्रव्य म्हणजे पैसा, धन, संपत्ती आणि दारा म्हणजे पत्नी किंवा त्यासोबतच कुटुंब किंवा स्त्री. तर ही कामना म्हणजे हव्यास, इर्षा हिची कास धरू नकोस. पैशाच्या किंवा स्त्रीच्या किंवा पत्नी कुटुंबासाठी तू हव्यास करू नकोस. त्यामुळे माणसाचा अधःपतन निश्चित आहे.

नुसताच संसाराच्या मागे लागलास तर तुला जे नेमून दिलेला कर्म आहे ते तू कधी करणार? ज्यासाठी येतो इतक्या यातना सोसून कित्येक योनी पार करून मानवाचे जन्माला आला आहेस, तिथे सत्कर्म करण्याऐवजी पण त्याच्या मोहात हव्यासात तू अडकलास तर तुझा अंतिम ध्येय जे की मुक्ती किंवा मोक्ष आहे ते तुला साध्या करता येणार नाही. आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकशील.

परत परत तुला त्या गर्भवासीची यातना भोगावी लागेल. मना यातना थोर रे गर्भवासी. पुन्हा पुन्हा जन्म घेतला म्हणजेच पुन्हा पुन्हा गर्भवासीचं दुःख यातना सोसत राहायचं आणि मृत्यूच्या वेळी मोहन मायने जमा केलेलं, ते सोडण्याचं दुःख सोसायचं. यात परत कसलीही कामना वासना राहिली की परत जन्माचं दुःख भोगायचं. या विषचक्रातून बाहेर पडायचं असेल तर समर्थांनी त्यासाठी उपाय सांगितला आहे.

तो काय तर “मना सज्जना भेटवी राघवासी”. मुक्ती खेरीज येरझारा थांबणार नाही आणि यातना भोगाव्या लागणार आहेत. तरी ह्याला उपाय म्हणजे हे मना, तू आधी सज्जन हो आणि राघवाची म्हणजे परमेश्वराची प्राप्ती कर.

तोच तुला मुक्तीचा मार्ग दाखवेल. मोक्ष देईल. तू परमेश्वराची भक्ती कर. त्याची ओढ तुला कायम मनात राहू दे. कायम त्याचे चिंतन भजन कर. त्यालाच शरण जा. फक्त तोच तुला या यातनेतून बाहेर काढेल. त्याच्या भेटीसाठी तळमळ हवी. मनाचा निश्चय हवा. मोहमाया सोडून त्याच्याशी एकरूप व्हायला हवं, असं समर्थ सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.