Mhalunge theft: खराबवाडी येथे कंपनीतून एक लाखाचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज : कंपनीचा पत्रा उचकटून अज्ञात चोरटयांनी (Mhalunge theft) एक लाख दोन हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 25) सायंकाळी खराबवाडी येथील अग्रवाल पॅकेजिंग प्रा ली या कंपनीत घडली.

भास्कर सखाहरी नेहे (वय 36, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khadakwasla Dam Update : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग केला कमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी काम करत असलेल्या अग्रवाल पॅकेजिंग प्रा ली या कंपनीच्या पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला.(Mhalunge theft) या कंपनीतून वेल्डिंग मशीन आणि जुने स्पेअर पार्ट असा एक लाख दोन हजार रुपये किमतीचे सामान चोरून नेले. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.