Maval : भर दिवसा घरासमोरून पळवली दुचाकी

एमपीसी न्यूज – घराच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी अनोळखी चोरट्याने (Maval) चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजताच्या सुमारास खंडाळा येथे घडली.

अंकित जयंतीलाल सोलंकी (वय 33, रा. खंडाळा बाजारपेठ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे खंडाळा येथे किराणा दुकान आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता ते दुकानात गेले. त्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या घरून त्यांना फोन आला.

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ धेंडे 132 निराधार विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे पालकत्व स्वीकारणार

त्यांच्या घराच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी (एमएच 14/जीजे 2620) अनोळखी व्यक्तीने (Maval) चोरून नेली. फिर्यादी यांनी कुटुंबियांसोबत परिसरात शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. मात्र त्यांची दुचाकी चोरून नेत असताना एकजण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लोणावळा शहर पोलिसांकडून दुचाकी चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.