Maval : ‘बाळाभाऊ’चा सहवास प्रत्येकाला हवाहवासा -सुनील हगवणे

एमपीसी न्यूज – बाळाभाऊंचा स्वभाव हा सर्वांशी प्रेमळ आणि हसतमुख आहे. एखाद्याला जरी काही वर्षानंतर पाहिले तरी त्यांना आपलेपणाची ओळख देणे या भाऊंच्या प्रेमळ स्वभावामुळे बाळाभाऊ सर्वांना आपलासा वाटतो. तालुक्याचा विकास करण्यासोबतच प्रत्येकाची आपुलकीने काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व आहे, असे मत देहूचे शिवसेना प्रमुख सुनील हगवणे यांनी शनिवारी व्यक्त केले.

देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिराचे शनिवारी सकाळी दर्शन घेऊन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी प्रचारास सुरूवात केली. सकाळच्या वेळी पाऊस सुरू झाल्यानंतर ही जाहीर प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी प्रचार रॅलीस गर्दी करत बाळा भेगडे यांना आशीर्वाद दिले.

यावेळी सुनील हगवणे यांनी सांगितले की, आमच्या गावच्या विकास आराखड्याला खरी चालना बाळा भाऊंच्या माध्यमातून मिळाली आहे. गावातील अंतर्गत रस्ते, बाह्य रस्ते, इंद्रायणी नदीवरील पूल, ड्रेनेज आणि वीज अशी अनेक विकासकामे करून गरीब जनतेसाठी घरकुल, बांधकाम कामगार योजना आणि विमा योजना गरिबांपर्यंत पोहचवून त्यांच्या विकासाला चालना दिली. देहू परिसरातील अनेक गायरणातील बांधकामे कायम करून ती घरे कायम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून त्यांना न्याय मिळवून दिला. त्या गरीब जनतेचा आणि तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आमच्या बाळा भाऊंवर राहील आणि ते अधिक मताधिक्याने निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वासही आहे.

आज शेवटच्या दिवशी देहूत संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराची सुरवात झाली. आज शेवटच्या दिवशी देहूत नागरिकांनी दाखविलेला उत्साह हा जणू काही विजयाचा गौरव असल्यासारखा होता. देहूत सर्वत्र भक्तिमय वातावरणात भेगडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी सकाळी सर्व तरुण वर्ग आणि महिलांनी दाखविलेली उपस्थिती लक्षणीय होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.