Maval Corona News : नवीन 96 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि.19 ) 96 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 147 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1017 आहे.

शहरी भागात 53 रूग्ण तर ग्रामीण भागात 43 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 26 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 17 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 10 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 29,622 झाली आहे, तर दिवसभरात 147 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले

बुधवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात टाकवे बुद्रुक येथे 08 रूग्ण सापडले. गहुंजे येथे 07 रुग्ण सापडले. नवलाख उंब्रे येथे 06 रुग्ण सापडले.शिरगाव येथे 05 रूग्ण सापडले. वराळे येथे 04 रुग्ण सापडले. कामशेत,सोमाटणे, व चावसर येथे प्रत्येकी 02 रूग्ण सापडला. तर तळेगाव दाभाडे ( ग्रामीण), कुरवंडे, शिवली,जांभूळ,कान्हे,येळसे व गोडुंब्रे येथे प्रत्येकी 01 रुग्ण सापडला.असे एकूण 43 रुग्ण सापडले.

28,080 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,590 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,910 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,466 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 15,966 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,656 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.79 टक्के आहे तर मृत्यू दर 1.77 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 414 , लोणावळा नगरपरिषदमध्ये 162 वडगाव नगरपंचायतमध्ये 45 व ग्रामीण भागात 396 असे एकूण 1017 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.