Maval Corona News : नवीन 04 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.21) 04 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 01जणाला डिस्चार्ज देण्यात आला.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 524 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 35 आहे.

शहरी भागात एकही रूग्ण नाही तर ग्रामीण भागात 04 रूग्ण आज सापडले.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही.तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण आज सापडला नाही.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रूग्ण आज सापडला नाही.

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 27,801 झाली आहे. तर दिवसभरात 01रुग्ण बरा झाल्याने घरी सोडण्यात आला.

सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वडगाव येथे 02 रूग्ण आज सापडले.आणि कुसगाव बुद्रुक व कुणे अणसुटे येथे प्रत्येकी 01रूग्ण सापडला.

27,241 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 524
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,894, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,551 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,384 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 14,829 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,972 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97.99टक्के आहे तर मृत्यू दर 1.89 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 14 , लोणावळा नगरपरिषदमध्ये 05, वडगाव नगरपंचायतमध्ये 01 व ग्रामीण भागात 15 असे एकूण 35 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.