Maval News: घरफोडी करून दागिन्यांसह टीव्ही पळवला

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि टीव्ही चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री साडेसात ते सोमवारी (दि. 20) सकाळी सात वाजताच्या कालावधीत मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे घडली.

गजानन ओंकार वडुळकर (वय 32, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर रविवारी रात्री साडेसात ते सोमवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 15 हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 10 हजार रुपये किमतीचा 32 इंची टीव्ही असा एकूण 25 हजारांचा ऐवज चोरून नेला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.